आता शासकीय कार्यालयाचे हेलपाटे थांबणार; १००० पेक्षा जास्त सेवा थेट व्हॉट्सॲपवर!
आता शासकीय कार्यालयाचे हेलपाटे थांबणार; १००० पेक्षा जास्त सेवा थेट व्हॉट्सॲपवर!
Read More
शासकीय योजनांच्या अर्जात चूक महागात पडणार; ‘फार्मर आयडी’ पाच वर्षांसाठी ब्लॉक होण्याचा धोका
शासकीय योजनांच्या अर्जात चूक महागात पडणार; ‘फार्मर आयडी’ पाच वर्षांसाठी ब्लॉक होण्याचा धोका
Read More
राउंडअपला पर्याय? बायरचे ‘अलायन प्लस’ तणनाशक दाखल; एकदा फवारणी केल्यास ५ ते ६ महिने तण
राउंडअपला पर्याय? बायरचे ‘अलायन प्लस’ तणनाशक दाखल; एकदा फवारणी केल्यास ५ ते ६ महिने तण
Read More
कोकण, मध्य महाराष्ट्र ते विदर्भात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता; निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांचा
कोकण, मध्य महाराष्ट्र ते विदर्भात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता; निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांचा
Read More

“कर्जमाफी करणारच!” – अजित पवारांचे नांदेडमध्ये आश्वासन; मात्र ‘योग्य वेळे’ची अट कायम

विशेष प्रतिनिधी, नांदेड: मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नांदेड येथे आयोजित एका पक्षीय कार्यक्रमात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच पक्षाच्या एका कार्यकर्त्याने, “शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार?” असा थेट आणि अनपेक्षित सवाल केला. या प्रश्नामुळे काही क्षण स्तब्ध झालेल्या उपमुख्यमंत्र्यांनी, “सरकार कर्जमाफी करणारच आहे, योग्य वेळी निर्णय घेऊ,” असे आश्वासन दिले, मात्र नेमकी वेळ सांगण्याचे टाळल्याने शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम कायम आहे.

काय घडले नांदेडमध्ये?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड दौऱ्यावर होते. कार्यक्रम सुरू असताना, पक्षाच्या एका कार्यकर्त्याने शेतकऱ्यांच्या वतीने आपली व्यथा मांडली. तो म्हणाला, “मागील चार-पाच वर्षांपासून शेतकरी अस्मानी संकटाने पूर्णपणे देशोधडीला लागला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात तर होत्याचे नव्हते झाले. पिके आणि जमिनी वाहून गेल्या. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. आमची कर्जमाफी कधी होणार?”

Leave a Comment